
उभळेतील विहिरीत आढळले मृतावस्थेत रानगव्याचे पिल्लू
चिपळूण तालुक्यातील उभळे येथे एका खासगी विहिरीत रानगव्याचे सुमारे १२ महिन्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. चिपळूण वन परिमंडळातील बचाव पथकाने या पिल्लाला बाहेर काढले. या पिल्लाचा पाण्यात बुडून मृत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या तपासात निष्पन्न झाले.
उभळे येथील सुधीर बाळकृष्ण चव्हाण यांच्या विहिरीत रानगव्याचे पिल्लू पडून मृतावस्थेत पाण्यात तरंगत असलेले विक्रात चव्हाण यांना दिसून आले. त्यांनी रामपूर वनरक्षक राहुल गुंठे यांना माहिती दिली. चिपळूण परिमंडळातील बचाव कार्य पथक तत्काळ दाखल झाले. वन अधिकार्यांनी पाहणी केली असता या विहिरीवर हिरव्या रंगाचे शेडनेट अंथरुन विहिरीचा वरील भाग झाकला होता. विहीर जंगल भागात व चढउतारात असल्याने हे पिलू विहिरीवर चढले असावे बचाव पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने दोरखंड व तारेच्या सहाय्याने या पिल्लाला बाहेर काढले.
पाच वर्षानंतरही दरडग्रस्त हक्काच्या प्रतिक्षेत
चिपळूण तालुक्यातील पोसरे-बौद्धवाडी येथील ७ घरांवर दरड कोसळून १७ जणांचा बळी गेलेल्या दुर्घटनेस ५ वर्षांचा कालावधी लोटूनही प्रशासनाने अजूनही त्यांच्या डोक्यावर छप्पर उपलब्ध करून दिलेले नाही. दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया कागदावरच राहिली आहे. यामुळे दरडग्रस्तांना यंदाचा पावसाळाही दुसर्याच्या ओसरीवरच काढावा लागणार आहे. प्रशासन अजूनही कागदी घोडे रंगवण्यातच मग्न असून दरडग्रस्तांची आजमितीसही अक्षरशः अवहेलना सुरू असल्याचा सूर आळवण्यात येत आहे.
२२ जुलै २०२१ रोजी तालुक्यात झालेल्या तुफानी अतिवृष्टीत पोसरे-बौद्धवाडीवर नियतीने झडप घातली. ७ जणांचे संसार दरडीखाली गाडले गेले. या दुर्घटनेत एकाचवेळी तब्बल १७ जणांना हकनाक प्राणास मुकावे लागले होते. दुघर्टनेनंतर दरडग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याची हमी प्रशासनाने दिली होती. मात्र ५ वर्ष लोटून देखील दरडग्रस्तांच्या पदरी निराशा पडली आहे. हक्कांच्या घरांसाठी शासन दरबारी खेटे घालूनही आश्वासनांची प्रत्यक्षात पूर्तता कण्यात प्रशासन असमर्थ ठरले आहे.
www.konkantoday.com




