तो’ फोन आला आणि यंत्रणा झाली गतिमानचिपळूणच्या गोवळकोट धक्का येथे मान्सूनपूर्व ‘मॉक ड्रिल’ ; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता जाहीर

रत्नागिरी, दि. १८ )- मान्सून पूर्वतयारी २०२६ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या निर्देशानुसार आज चिपळूण येथील गोवळकोट धक्का येथे आपत्ती व्यवस्थापनाची ‘रंगीत तालीम’ म्हणजेच मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा किती तत्पर आहे, याची चाचपणी या माध्यमातून करण्यात आली.
​तो’ फोन आला आणि यंत्रणा गतिमा


​आज अचानक गोवळकोट धक्का येथे एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याची माहिती तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून (कंट्रोल रूम) सर्व संबंधित विभागांना फोनद्वारे देण्यात आली. या संदेशानंतर तात्काळ हालचाली करत सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या साधनांसह अवघ्या काही मिनिटांत गोवळकोट धक्का येथे दाखल झाले.
​सर्व यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्यानंतर, ही प्रत्यक्षात घडलेली दुर्घटना नसून मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेण्यात आलेले ‘मॉक ड्रिल’ (रंगीत तालीम) असल्याचा निरोप देण्यात आला. यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. या तातडीच्या कॉलवर सर्व यंत्रणांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
​यानंतर उपस्थितांना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये ​बोट आणि बचाव साहित्य, बोटीचा वापर, लाईफ जॅकेटचे महत्त्व आणि ते वापरण्याची पद्धत.
​ बुडालेल्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर करायचे प्रथमोपचार.
​नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन: पूर किंवा अतिवृष्टीच्या काळात घ्यावयाची काळजी व उपाययोजना.
​या मॉक ड्रिलबाबत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, रत्नागिरी यांना आधीच पूर्वकल्पना देण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या रंगीत तालमीत ​तहसीलदार कार्यालय, चिपळूण, मंडळ अधिकारी गोवळकोट,​ चिपळूण नगरपरिषद फायर ब्रिगेड गाडी, रेस्क्यू बोट आणि लाईफ जॅकेटसह कर्मचारी यांनी सक्रीय सहभाग नोंदवला
​तालुका आरोग्य विभागामार्फत डॉक्टर्स, कर्मचारी आणि सुसज्ज रुग्णवाहिका, ​पोलीस विभाग, गोवळकोटच्या नगरसेविका, ग्राम महसूल अधिकारी आणि स्थानिक ‘आपदा मित्र’ स्वयंसेवक देखील सहभागी होते.
“मान्सूनच्या काळात कोणतीही आपत्ती आल्यास प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन तहसीलदार प्रविण लोकरे यांनी यावेळी उपस्थित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button