४८ तासात स्मार्ट मीटर बसवून दाखवाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महावितरणविरोधात आक्रमक भूमिका


रत्नागिरी स्मार्ट मीटर ब्रसविण्याच्या प्रक्रियेवरून रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महावितरण प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरणच्या ठाणे परिमंडळाकडून वीज ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या संदेशामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरणकडून लाखो बीज ग्राहकांना ४८ तासांच्या आत स्मार्ट मीटर बसविण्यात येईल’ असा संदेश पाठविण्यात आला होता. या संदेशानंतर अनेक ग्राहकांनी याला धमकीवजा स्वरूप असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ’लोकशाहीत नागरिकांच्या संमतीला महत्त्व आहे की हुकूमशाही पद्धतीने निर्णय लादले जात आहेत?’ असा सवालही अनेकांनी उपस्थित केला.
ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर शिवसेना ठाकरे कार्यालयात दाखल झाले. यावेळी गटाचे पदाधिकारी महावितरण जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी प्रशासनाला वेट इशारा देत, ज्या पद्धतीने महावितरणने जनतेला ४८ तासांत स्मार्ट मीटर बसविण्याचा दम दिला, त्याच पद्धतीने आम्हीही अधिकार्‍यांना सांगतो की ४८ समाति एक तरी मीटर बसवून दाखबा, मग पुढचे पाहू, असे ठामपणे सांगितले,
यावेळी तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शाखाप्रमुख प्रशांत साळुंखे, तालुका युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय शशी बारगोडे, महिला उपजिल्हा देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, संघटक रशिदा गोदङ, महिला शहर संघटक बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button