
नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाणार -पालकमंत्री उदय सामंत
यंदा पावसाने ओढ दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा केवळ १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, गरज भासल्यास रत्नागिरी शहरातील नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.दरवर्षीच्या तुलनेत १५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ दीड टक्का पाऊस झाला असून, प्रशासनाने आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.




