
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे कुंपणाच्या वादातून भावजयीवर कोयत्याने वार
रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे कुंपण घालण्याच्या वादातून भावजयीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सुनिता सुनील कांबळे (आगरनरळ रत्नागिरी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचे पती सुनील रामजी कांबळे यांनी जयगड पोलीस ठाण्यात आपल्या भावाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिल रावजी कांबळे (आगरनरळ, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिल कांबळे हा १३ जून रोजी सायंकाळी आपल्या घरासमोरील जागेत कुंपण करत होता. यावेळी भावजय सुनिता कांबळे यांनी आमच्या इथे कुंपण करु नका, असे सांगितले. यावरुन अनिल कांबळे व सुनिता कांबळे यांच्यात जोरदार वाद झाला. या रागातून अनिल कांबळे याने कोयत्याने सुनिता यांच्या डोक्याच्या मागील बाजूस वार करुन जखमी केले, अशी तक्रार जयगड पोलिसात दाखल केली आहे. अनिल कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




