महाग झाले तरी रत्नागिरीत पेट्रोल विक्रीत १४.५२ टक्के, डिझेल विक्रीत १०.१४ टक्के वाढ


रत्नागिरी जिल्ह्यात इंधन विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा पेट्रोल विक्री २,१५४.८६ मेट्रिक टनांवर पोहोचली असून, गेल्या वर्षी ती १,८८१.६४ मेट्रिक टन होती. यामध्ये १४.५२ टक्के वाढ झाली आहे. डिझेल विक्री ३,५३९.६७सेट्रिक टनांवरून ३,८९८.७६ मेट्रिक टनांपर्यंत वोढली असून, त्यात १०.१४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने महाराष्ट्रभर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंड व सुरळीत पुरवठा कायम ठेवत्ता असून, राज्यातील वाढती इंधन मागणी ही आर्थिक प्रगती, वाहतूक क्षेत्रातील विस्तार आणि औद्योगिक विकासाचे संकेत असल्याचे समोर आले आहे.
फॉर्च्यून ग्लोबल ५०० यादीतील आणि महारत्न दर्जा प्राप्त सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या बीपीसीएलने मजबूत पुरवठा साखळी, एकात्मिक वाहतूक व्यवस्था आणि विस्तृत रिटेल नेटवर्कच्या माध्यमातून राज्यातील शहरी, औद्योगिक, कृषि आणि पर्यटन क्षेत्रांना सातत्याने सेवा दिली आहे.
मे २०२६ मध्ये महाराष्ट्रातील बीपीसीएलच्या पेट्रोल विक्रीने १ लाख ३८ हजार ५०० मेट्रिक टनांचा टप्पा गाठला. मे २०२५ मध्ये ही विक्री १ लाख २९ हजार ३२० मेट्रिक टन होती. त्यामुळे पेट्रोल विक्रीत ७.१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिझेल विक्री २ लाख ८५ हजार ३७० मेट्रिक टनांवरून ३ लाख २४ हजार ९०० मेट्रिक टनांपर्यंत वाढली असून, त्यात १३.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, पायाभूत सुविधा विकास, औद्योगिक कोमकाज, कृषि क्षेत्रातील हालचाली आणि पर्यटन क्षेत्रातील वाढ यामुळे राज्यात इंधनाची मागणी सातत्याने वाढत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मे २०२६ दरम्योप्त बीपीसीएलने रत्नागिरी जिल्ह्यात ३३ हजार ६३७ घरमुर्ती एलपीजी सिलिंडर आणि १ हजार ४२३ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button