वाडिलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पुनस आरोग्य उपकेंद्र येथे कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू येथील अंतर्गत आरोग्य उपकेंद्र पुनस अंतर्गत गाव वीरगाव येथे कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सरपंच सौ. वैदेही शांताराम वीर यांच्या हस्ते तेथील चिरेखणीमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन पुनस आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य सेवक सुधीर लिंगायत यांनी केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबूचे आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव यांनी उपस्थित ग्रामस्थांना गप्पी मासे सोडण्याचा उद्देश सांगून कीटकजन्य आजार होऊ नये म्हणून आजार येण्याआधी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापैकी हा एक उपाय होय. तसेच आपल्या भागात कोरडा दिवस पाळा, गटारे वाहती ठेवा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावा, संडासच्या व्हेन पाईप व आउटलेटला मच्छरदाणीचे कापड लावा, घरांच्या खिडक्यांना मच्छरदाणीचे लावा, घरांच्या शेजारील डबके बुजवून टाका, शक्यतो घराशेजारी पाणी साठवून नका, एखाद्या ड्रममध्ये पाणी साठवून ठेवत असाल तर त्याचे तोंड कापडाने झाकून ठेवावे/बांधून ठेवा, झोपताना अंगभर कपडे घालून झोपावे, आदी सूचना यावेळी देण्यात आल्या.
तसेच आपल्या भागात पुणे, मुंबई किंवा ज्या ठिकाणी कीटकजन्य आजारांचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत अशा भागातून कोणी व्यक्ती आल्यास त्यांना तात्काळ जवळच्या आशा, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणी करून घ्यावी, अशा प्रकारे आरोग्य शिक्षण देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button