
रत्नागिरी पोलिसांकडून २०२६ मध्ये अंमली पदार्थविरोधी कारवाईत ५ महिन्यात २७ जणांना अटक
रत्नागिरी पोलिसांकडून २०२६ मध्ये आतापर्यंत अमली पदार्थ विरोधातील कारवाईत एकूण २७ संशयितांना अटक केली आहे. अमली पदार्थांविरोधात जिल्हाभरात १७ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. त्यामध्ये ८ अमली पदार्थ सेवनाची तर ९ अमली पदार्थ बेकायदेशीर ताब्यात बाळगल्याची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
त्यामध्ये पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये ६ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्ह्यात अमली पदार्थांचे सेवन, विक्री व तस्करी यांना प्रभावी आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत ’मिशन फिमनक्स’ हा विशेष अमली पदार्थविरोधी उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे ’यांच्या मार्गदर्शनाखाली २५ मे २०२५ पासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला सन २०२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळाले आहे.
’मिशन फिमनक्स’ हा उपक्रम केवळ गुन्हे दाखल करण्यापुरता मर्यादित नसून, युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविणे, समाजात जनजागृती निर्माण करणे आणि अमली पदार्थमुक्त रत्नागिरी घडविणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस पथकांनी प्रभावी छापेमारी व तपास मोहीम राबवत कारवाई केली आहे..
www.konkantoday.com




