बँक कर्मचारी आत्महत्या प्रकरण; फरार दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू


चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील बँक कर्मचारी मुकुंद मुरलीधर पालांडे यांच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने अटक आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून उर्वरित दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत.

मुकुंद पालांडे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चार पानी पत्रात अनोखी अखिलेश खेडेकर, अखिलेश खेडेकर, धनंजय शेट्ये, आशिष सावंत, योगेश मोरे आणि वेदांत विजय टाकळे यांची नावे नमूद केली होती. संबंधितांकडून वारंवार दमदाटी, आर्थिक दबाव तसेच मारहाणीचा प्रयत्न होत असल्याने आपण मानसिक तणावाखाली असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला होता.

या पत्राच्या आधारे मुकुंद यांचे वडील मुरलीधर पालांडे यांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सहाही जणांविरोधात गुन्हा नोंदवून चौघांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, आरोपी धनंजय शेट्ये आणि आशिष सावंत हे अद्याप फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button