आंबेशेत येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग


रोख रक्कम, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी
सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला


रत्नागिरी शहरानजीक असलेल्या आंबेशेत गावामध्ये सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे राहत्या घरामध्ये भीषण आग लागली. संजय देवजी घाणेकर यांच्या भाड्याच्या घरामध्ये लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य आगीमध्ये भस्मसात झाले आहे. घरातील रोख रक्कम, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे इतर वस्तूंना आगीने कवेत घेतले.
स्थानिक नागरिक आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या अग्निशामक बम्बाने ही आग विझवली गेली. स्थानिक नागरिकांनी समयसूचकतेने घरातील घरगुती गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button