माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल ,सुनेनेच केली तक्रार ,अघोरी उपचार, मानसिक-शारीरिक छळाचे आरोप


ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात विनायक राऊत यांची सुन गिरीजा हिने राऊत कुटुंबाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे महिलेने तिचा पती गितेश विनायक राऊत, माजी खासदार विनायक भाऊराव राऊत, सासू शामल विनायक राऊत यांच्यासह एकूण सात जणांविरोधात गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरमध्ये तक्रारदार सुनेनेराऊतकुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत विवाहानंतर पतीकडून शारीरिक संबंध टाळणे, मानसिक व आर्थिक छळ करणे, मूल होण्यासाठी वैद्यकीय उपचारांऐवजी अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध ठिकाणी नेऊन कथित अघोरी उपचार करणे, तसेच सासरच्या मंडळींकडून सातत्याने त्रास दिल्याचे आरोप केले आहेत.
तक्रारीनुसार, विवाहापूर्वी राहण्याच्या घराबाबत चुकीची माहिती देण्यात आली. विवाहानंतर पतीने नोकरी सोडण्यास भाग पाडले, आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवले आणि मानसिक छळ केला. तसेच अनेक वर्षे वैवाहिक संबंध प्रस्थापित न करता विविध बाबा व मांत्रिकांकडे नेऊन उपचार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीत फिरोज बाबा, काझी बाबा, हरीशचंद्र घाडी तसेच गितेश राऊत यांचे चुलते आबा राऊत यांचाही उल्लेख असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली विविध विधी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम, २०१३ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 115(2), 318(2), 351(2) आणि 85 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्ह्यातील आरोपींची नावे (एफआयआरनुसार):
गितेश विनायक राऊत
विनायक भाऊराव राऊत (माजी खासदार)
शामल विनायक राऊत
आबा राऊत
फिरोज बाबा
काझी बाबा
हरीशचंद्र घाडी

राऊत यांच्या सुनेनेच अशी तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे याबाबत पोलीस तपास सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button