नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे उद्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम

ज्येष्ठ रंगकर्मी सुधीर उर्फ आप्पा वणजू आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद गानू यांचा होणार सन्मान

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने ५ नोव्हेंबर) रोजी मराठी रंगभूमी दिन येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.
मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने नटराज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे परफॉर्मिंग आर्टचे विद्यार्थी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्याचबरोबर नाट्य परिषदेने आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते देखील अभिवाचन करणार आहेत.
रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने दरवर्षी दोन ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान केला जातो. यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे माजी अध्यक्ष सुधीर उर्फ आप्पा वणजू आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद गानू यांचा सन्मान केला जाणार आहे.
श्री. गानू यांनी साधारणतः १९७०-७१ पासून एकांकिकेत सहभाग घेऊन नाट्यकलेला सुरुवात केली. त्यामध्ये “यु मस्ट डाय”, “देवाचे घर”, “हंगर स्ट्राइक”, “ब्रिज” अशा अनेक एकांकिकांमधून छोटी मोठी कामे केली. त्यानंतर “कालाय तस्मै नमः”, “वेगळे व्हायचे मला”, “श्रीमंत पतीची राणी”, “काळोख देत हुंकार”, “हलाहल” अशा अनेक दोन अंकी नाटकातून देखील त्यांनी त्या काळात भूमिका साकार केल्या होत्या. त्या काळातील प्रसिद्ध असलेल्या अलंकार थिएटर आणि स्टार थिएटर रत्नागिरी या संस्थांशी ते अजूनही जोडलेले आहेत.
रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button