
मोदीजींनी सांगितल्यावर आम्ही समुद्रातही उडी मारू : आमदार प्रमोद जठार यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
भाजपचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शासकीय विश्रामगृह खेड येथील पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना जठार यांनी देश आणि जग सध्या संकटाच्या परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी मोदींसारखे मजबूत नेतृत्व देशाला लाभले आहे. देशातील सरकार मजबूत असून जनतेने मोदीजींच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकत्यांच्या निष्ठेचाही उल्लेख करत, उद्या मोदीजींनी देशरक्षणासाठी समुद्रात उडी मारायला सांगितले, तरी आम्ही सर्वजण समुद्रात उडी मारू. आमचा आमच्या नेत्यावर दृढ विश्वास आहे असे विधान केले.www.konkantoday.com




