विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 2026 ; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वांनी जागरुकपणे काम करावे – कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल


रत्नागिरी, दि. २ ) – निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वांनी जागरुकपणे काम करावे. प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीबाबत काही सूचना हरकती त्रुटी असतील तर त्या कळवाव्यात. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज 6 भरुन घ्यावा, त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज झाली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई, वैशाली पाटील, आकाश लिगाडे आदी उपस्थित होते.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. आयुक्त श्रीमती अगरवाल म्हणाल्या, प्रसिध्द झालेली प्रारुप यादी सर्वांनी पहावी. काही त्रुटी हरकती सूचना असतील तर कळवाव्यात. विशेष ग्रामसभेमध्ये यादी ग्रामसेवकांनी तपासावी, तशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी द्यावी. नवीन मतदारांचे नाव नोंदणी अर्ज 6 भरुन करावी. त्यासाठी विशेष स्टॉल्स उभे करावेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वांनी जागरुकपणे काम करावे.
शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, प्रशांत साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तालुका अध्यक्ष सनिफखान गवाणकर, आपचे सचिव हबीब बवाणी, खलील वस्ता, सुर्यकांत तांबे, भाजपा जिल्हा सरचिटणीस औंकार फडके, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत उपस्थित होते. तर आमदार शेखर निकम दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button