खेड ते महाबळेश्वर केबल स्टेड स्काय ब्रिजच्या कामाची भाजपा नेते ॲड. वैभव खेडेकर यांच्याकडून पाहणी

खेड : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा खेड (जि. रत्नागिरी) ते महाबळेश्वर (जि. सातारा) असे दोन पर्यटन जिल्हे जोडणारा कोयना बॅक वॉटर तापोळे येथे सुरू असलेला भव्य असा केबल स्टेड स्काय ब्रिजचा काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यानंतर वाहतुकीसाठी खुला होणार असून भाजपा नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी या कामाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी ॲड. खेडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. या वेळी भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, स्वराज गांधी, चंद्रकांत बनकर, प्रदीप भोसले, यश साळवी, ओवेस चौगुले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button