रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे झाडावरुन पडलेल्या वृद्धाचा मृत्यू


रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथे झाडावरुन पडून जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश आबा मांडवकर (७१, रां. कोतवडे, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. सुरेश मांडवकर हे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रातांब्याच्या झाडावर शिडी लावून रातांबे काढण्यासाठी चढले होते. अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. ते गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button