मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे दुचाकी दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू


मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकल्याने हा अपघात घडला.

महेश अरुण गुडेकर (वय ५०, रा. श्री समर्थनगर, सी-विंग, कापसाळ, डिगेवाडी, ता. चिपळूण) असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे.

, महेश गुडेकर हे शनिवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता आपली हँडीकॅप सुझुकी ॲक्सेस १२५ दुचाकी (क्र. एमएच-०८-बीबी-७०२८) घेऊन रावतळे येथील रेडीज पेट्रोल पंपावरून कापसाळच्या दिशेने निघाले होते. रात्री साडेसातच्या सुमारास ते कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर आले असता दुचाकीवरील ताबा सुटला.

दुचाकी भरधाव वेगात असल्याने गुडेकर हे वाहनासह रस्त्यावर काही अंतर फरफटत गेले आणि महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या दुभाजकाला धडकले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button