रत्नागिरीतील शासकीय मत्स्यालय ठरत आहे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण


रत्नागिरी येथील निसर्ग आणि समुद्रकिनार्‍यांसोबतच शासकीय मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीचा ’हॉटस्पॉट’ ठरत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात या मत्स्यालयाने लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, वर्षभरात तब्बल १ लाख ६२ हजार ८०० पर्यटकांनी या जलचरांच्या अद्भुत दुनियेला भेट दिली आहे. या विक्रमी गर्दीमुळे शासनाच्या तिजोरीत एकूण ३२ लाख ५६ हजार रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे.
रत्नागिरीच्या या मत्स्यालयात जगभरातील विविध प्रजातींचे रंगीबेरंगी मासे आणि दुर्मिळ सागरी जीव पाहायला मिळतात. केवळ मनोरंजनच नव्हे तर सागरी जीवांची शास्त्रोक्त माहिती देणारे केंद्र म्हणूनही हे मत्स्यालय ओळखले जाते. त्यामुळेच सुट्ट्यांच्या काळात आणि वीकेंडला येथे पर्यटकांची मोठी झुंबड उडत आहे. पर्यटकांच्या या वाढत्या संख्येमुळे एकट्या प्रवेश शुल्कातून प्रशासनाला ३२ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पर्यटनाला मोठी चालना मत्स्यालयाचे उत्तम व्यवस्थापन आणि तेथील नवनवीन बदल यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. याचा थेट सकारात्मक परिणाम रत्नागिरीतील स्थानिक पर्यटन व्यवसायावरही होत आहे मत्स्यालयाने गाठलेला हा टप्पा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button