उन्हाळी सुट्टीतील गर्दी कमी करण्यासाठी सावंतवाडी-पनवेल मार्गावर धावणार विशेष ट्रेन!


उन्हाळी सुट्टीतील गर्दी कमी करण्यासाठी कोकण व मध्य रेल्वेच्या समन्वयाने १६ ते ६ जून या कालावधीत सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल चालवण्यात येणार आहे. २० एलएचबी डब्यांच्या स्पेशलच्या ४ फेर्‍या धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी रात्री जाहीर केले.
०१००८/०१००७ क्रमांकाची सावंतवाडी-पनवेल स्पेशल दर शनिवारी धावेल. सावंतवाडी येथून सकाळी ७.२० वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ५
वाजता पनवेलला पोहचेल. परतीच्या प्रवासात सायंकाळी ६.१० वाजता पनवेल येथून सुटून दुसर्‍या दिवशी पहाटे ४.३० वाजता सावंतवाडी येथे पोहचेल. या स्पेशलला कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड आदी थांबे आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button