
आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रत्नागिरीत जनजागृती मोहीम.
परिसर स्वच्छ ठेवून डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थळी गप्पी मासे सोडणे, डबकी बुजविणे आणि तुंबलेली गटारे वाहती करणे, टायर, प्लास्टिक, भंगार साहित्य यांची विल्हेवाट लावणे, गावात गप्पी मासे पैदास केंद्रे सुरू करणे, अशा सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात २०२३ मध्ये डेंग्यूचे २३९ रुग्ण, २०२४ मध्ये २५६ रुग्ण आढळले होते. तर २०२५ मध्ये हे प्रमाण घटून ४२ रुग्णांपर्यंत आले. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे २०२६ मध्ये जानेवारीपासून आजपर्यंत केवळ ३ रुग्ण आढळल्याची माहिती डॉ. संतोष यादव यांनी दिली.
दरवर्षी १६ मे रोजी साजर्या करण्यात येणार्या राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात कीटकजन्य रोग नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यासंदर्भात सर्व आरोग्य कर्मचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com




