
नापासासाठी स्वतंत्र शाळांची गरज : ऍड. विलास पाटणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२६ दहावी परीक्षेत कोकण बोर्डाने सलग पंधराव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१२ साली स्थापन झालेल्या कोकण बोर्डाने यंदा ९७.६२ टक्के निकालाची नोंद करत राज्यातील नऊ विभागांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असतानाच शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करताना ऍड. विलास पाटणे यांनी शिक्षण व्यवस्थेवर कठोर टीका केली आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन, योग्य सराव, नियोजन आणि परस्पर संवाद यामुळे ’कोकण पॅटर्न’ने महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे मुलींनी यंदाही गुणवत्तेत आपले वर्चस्व कायम राखल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, बारावीमध्ये १ लाख ४६ हजार २१५ आणि दहावीमध्ये १ लाख २८ हजार विद्यार्थी नापास झाल्याची बाब गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात वावर्षी एकूण २ लाख ७४ हजार ३१५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे मर्ंगत, विद्यार्थ्यांना
नापास करून त्याच वर्गात ठेवणे म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होणे नव्हे, असे मत त्यांनी व्यक्त केले. असा शिक्का बसल्याने अनेक विद्यार्थी मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जातात. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन, साहित्यिक कुसुमाग्रज, अभिनेते अमिताभ बच्चन आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हेही आयुष्यात कधीतरी परीक्षेत अपयशी ठरले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. ’मार्क लिस्ट समाजाकडून ’नापास म्हणजे आयुष्याचा ताळेबंद नसतो आणि दहावी-बारावीची परीक्षा ही अंतिम परीक्षा नसते. एक दरवाजा बंद झाला तरी अनेक संधी विद्यार्थ्यांसमोर उभ्या असतात,’ असे सांगत नापास विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
www.konkantoday.com




