मदन मोडक यांनी उन्हातान्हात फिरणार्‍या गायी-गुरांसाठी केली पाण्याची व्यवस्था


भारतीय संस्कृतीत भूतदया आणि प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश दिला जातो. याच भावनेतून देवरुख येथील मदन वामन मोडक यांनी मूक जनावरांसाठी उल्लेखनीय पुढाकार घेतला आहे. कडक ऊन्हाळ्यात तहानलेल्या गायी-गुरांसाठी त्यांनी आपल्या घराजवळ पाण्याची सोय करून एक आदर्श उभा केला आहे.
कॉलेज रोड परिसरात राहाणारे मदन वामन मोडक हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. मे महिन्यातील प्रचंड उष्णतेमुळे रस्त्यावर फिरणार्‍या जनावरांचे हाल होत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी गोसेवेच्या भावनेतून पाण्याची व्यवस्था उभारली. या ठिकाणी ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून रस्त्यावरून जाणारी गायी-गुरे आपली तहान भागवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सध्या ही व्यवस्था एका ठिकाणी करण्यात आली असली तरी गरज भासल्यास आणखी ठिकाणी पाण्याची सोय करण्याचा मानस मोडक यांनी व्यक्त केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button