
बुद्धिस्ट प्रीमियर लीगचा विजेता ठरला संघ स्ट्रायकर्स
संगमेश्वर येथे आयोजित स्पर्धेला क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमेश्वर : तालुक्यात आयोजित करण्यात आलेली बुद्धिस्ट प्रीमियर लीग २०२६ (बीपीएल) ही क्रिकेट स्पर्धा उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात दणक्यात पार पडली. या स्पर्धेत दैवत पवार यांच्या संघ स्ट्रायकर्सने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. चैताली जाधव यांचा समर-११ संघ उपविजेता ठरला.

विक्की कांबळे यांचा भीमज्योत वॉरियर्स संघाला तृतीय, तर
राजेंद्र मोहिते यांच्या रॉयल उमरे संघाला चतुर्थ क्रमांक देण्यात आला. या स्पर्धेत एकूण १० संघांनी स्पर्धेत सहभागा नोंदवला.
स्पर्धेदरम्यान मैदानाची उत्कृष्ट व्यवस्था, वेळेचे काटेकोर नियोजन, खेळाडू व प्रेक्षकांसाठी केलेल्या सोयीसुविधा यामुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत आणि आकर्षक ठरली.
प्रथम चार क्रमांकांना अनुक्रमे २० हजार रुपये, १५ हजार रुपये, ८ हजार रुपये आणि ७ हजार रुपये व प्रत्येकी चषक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्तम फलंदाज अमित शिवगण (समर-११), सर्वोत्तम गोलंदाज तन्मय कांबळे (बिट्टू, संघ स्ट्रायकर्स), मालिकावीराचा किताब अनिकेत पवार (संघ स्ट्रायकर्स) यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेसाठी आयोजक जित पवार, सूरज जाधव, दिनेश जाधव, शेखर कांबळे, विजय तांबे, संघपाल तांबे, अमोल कांबळे, रूपेश जाधव, दीपक शिवगण, प्रज्योत कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले. नियोजनबद्ध कामकाज आणि एकजुटीमुळेच ही स्पर्धा भव्य यशस्वी ठरली, असे मत खेळाडू व प्रेक्षकांनी व्यक्त केले.



