साकुर्डेमध्ये चिरेखाणीवरून ६० हजार रुपयांची तांब्याची तार चोरीस


दापोली तालुक्यातील बौद्धवाडी परिसरात अज्ञात साकुर्डे-चोरट्यांनी चिरेखाणीवरून सुमारे ६० हजार रुपये किंमतीची श्री-फेज तांब्याची तार लंपास केल्याची घटना २९ एप्रिल रात्री ११ ते ३० रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण सहदेव मर्चेंडे (४६, रा. साकुर्डे बौद्धवाडी) यांची गोरजाईचा कातळ येथे चिरेखाण आहे. येथून अज्ञात इसमाने २९ ते ३० एप्रिलदरम्यान सुमारे १०० मीटर लांबीच्या दोन तांब्याच्या तारा चोरून नेल्या. या चोरीत एकूण सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस फौजदार मोरे करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button