
मोठी बातमी! बच्चू कडू धनुष्यबाण हाती घेणार
राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. तसेच विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी रात्री बच्चू कडू यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती मात्र यावर बोलताना बच्चू कडू यांनी प्रहार संघटना कायम ठेवणार असल्याची माहिती दिली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी रात्री बच्चू कडू यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती मात्र यावर बोलताना बच्चू कडू यांनी प्रहार संघटना कायम ठेवणार असल्याची माहिती दिली आहे.




