
रत्नागिरी जिल्ह्यात दीड महिन्यात पुन्हा एकदा बसला भूकंपाचा धक्का
गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा दुसरा धक्का बसला आहे
*आज दिनांक २९ एप्रिल रोजी दु. २वा.१७मिनिटांनी २.७ रिश्टर स्केल चा सौम्य भूकंप झालेला आहे. सदर भूकंपाचा केंद्रबिंदू येगाव ता. चिपळूण आहे
*यापूर्वी १२ मार्च रोजी भूकंपाचा धक्का बसला होता तेव्हा भूकंपाचे केंद्र रत्नागिरी तालुक्यातील हर्चे येथे होते



