सहाय्यक पोलीस निरीक्षकाला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.


रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथे शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार वायचळ यांना त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आक्षेपार्ह वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वायचळ यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील चौघा संशयितांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिरुद्ध त्रंबक फडके (४२), सौरभ सुरेश साळुंखे (३८), नितीन पोवार व सुयश साळुंखे (सर्व कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
वायचळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी हे शनिवारी रात्री २.३० वाजता पांढरा समुद्र, मुरुगवाडा ते मिरकरवाड्याकडे जाणार्‍या रस्त्यावर कार (एमएच ०९ ईके ९७७६) मध्ये दारु पिण्यासाठी बसलेले होते. याबाबत वायचळ यांनी आरोपींना विचारणा केली. कारमध्ये दारु पित असलेल्या संशयित आरोपींना वायचळ यांनी विचारणा केल्याचा राग आला. संशयितांनी वायचळ यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. तसेच वायचळ यांना त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button