मिरजोळे-शीळ ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नासाठी शिवसेना तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील सरसावले; प्रत्यक्ष पाहणीनंतर पाटबंधारे विभागाला तोडगा काढण्याचे आदेश.

रत्नागिरी नगर परिषदेला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामुळे मिरजोळे-शीळ परिसरातील स्थानिक ग्रामस्थांना दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मार्च ते मे या कालावधीत नदीपात्र कोरडे पडल्याने ग्रामस्थांचे होणारे हाल थांबवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांनी पुढाकार घेतला असून, प्रशासकीय स्तरावर आक्रमक पवित्रा घेतला आहे.या गंभीर समस्येची दखल घेत तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांच्या व्यथा मांडल्या आणि उन्हाळ्याच्या शेवटच्या तीन महिन्यांत गावाचा पाणीपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली.या पाहणी दौऱ्यावेळी मयरेश्वर पाटील यांच्या समवेत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री. चिरमुरे साहेब आणि शाखा अभियंता श्री. धामापूरकर उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या समस्येवर लवकरच तांत्रिक बाबी तपासून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी उपतालुकाप्रमुख विजय देसाई, मिरजोळे गावचे उपसरपंच अशोक विचारे आणि मिरजोळे-शीळ परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. मयुरेश्वर पाटील यांच्या या धाडसी पुढाकारामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, आता प्रशासकीय पातळीवर जलद गतीने हालचाली होणे अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button