कोकणच्या हापूस आंब्याची वेगळी ओळख, आता अन्य राज्यांतील आंब्यांना लेबल


कोकणातील हापूस आंबा रूचकर असतो. त्याचा फायदा इतर राज्यातील घेतात. म्हणून अन्य प्रांतातील आंब्याला त्यांच्या राज्याचे लेबल लावूनच त्याची विक्री करा, अशा सूचना बाजार समितीच्यावतीने बाजारातील घावूक व्यापार्‍यांना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघटनेच्यावतीने बाजार समितीकडे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार बाजार समितीने व्यापार्‍यांना या सूचना दिल्या आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील काही वर्षे कोकणातील हापूसशी साधर्म्य असलेला आंबा कर्नाटक, केरळ राज्यातून मोठ्या प्रमाणात येत आहे. याचा परिणाम कोकणातील हापूसच्या विक्रीवर होत आहे. कोकण हापूसच्या नावाने हा आंबा एपीएमसीमध्ये घावूक आणि किरकोळ स्वरूपात विकला जात आहे. हा आंबा चवीला निकृष्ट दर्जाचा आहे. कोकण हापूस अवीट गोडीचा व उच्च दर्जाचा आहे. त्यामुळे इतर जातीच्या आंब्याना ती चव येत नाही. यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.
ग्राहकांची फसवणूक होवू नये तसेच ग्राहकाला अस्सल हापूस खाण्यास मिळावा यासाठी एपीएमसीमध्ये कर्नाटक व ×अन्य प्रांतातील आंबा वेगळा ठेवावा. त्यावर त्या राज्याचे नाव असलेले लेबल लावण्यात येवून ग्राहकांची फसवणूक थांबवावी, अशी विनंती आंबा उत्पादक सणाच्या वतीने करण्यात आली होती. त्या अनुषंगाने बाजार समितीकडून पुढील कार्यवाही करण्यात आली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button