२७ एप्रिल रोजी रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा बंद

रत्नागिरी : नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडील शीळ जॅकवेलचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी येत्या सोमवारी (२७ एप्रिल) एमएसईबीकडून बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पाणी विभागाकडूनही व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीचे काम सोमवारी करण्यात येणार असल्याने २७ एप्रिल रोजी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button