
मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील भाट्ये व पोमेंडीखुर्द येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन प्रौढांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ज्ञानेश्वर भार्गव भाटकर (वय ४९, रा. भाट्ये जोयनाकवाडी, रत्नागिरी) व विनायक विठ्ठल पिलणकर (वय ५, रा. पोमेंडी खुर्द-बौद्धवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता. २२) सायंकाळी साडेपाच ते रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित भाट्ये व पोमेंडीखुर्द येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल सोनल शिवलकर व गौरी सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



