चक्कर आलेल्या नेपाळी खलाश्याचा मृत्यू

रत्नागिरी ः चक्कर आलेल्या नेपाळी खलाशाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. रामलाल फुलराम थारू (वय ४७, रा. टिकापूर, जि. कैलाली, नेपाळ सध्या रा. नाटे मुसाकाजी जेटीवर, ता. राजापूर, रत्नागिरी) असे मृत खलाश्याचा नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १८) दुपारी एक च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामलाल थारु हा बक्तीयार अब्दुललतीफ सोमेस्कर यांच्या अब्दुल लतीफ नावाच्या मच्छीमारी बोटीवर मासेमारी करण्यासाठी कामाला होता. त्यांची बोट नाटे येथील मुसाकाजी जेटीवरुन समुद्रात गेली होती. बोटीवर मच्छीमारी करण्यासाठी १७ नेपाळी व बोट चालविणारे अन्य दोघे असे बोटीवर होते. ही बोट आंबोळगड बंदराजवळ पाण्यात मच्छीमारी करत असताना सकाळी पावणे नऊच्या सुमारास मयत रामलाल थारू याला चक्कर आली. बेशुद्ध पडला. त्याला सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button