
भरणेनजीक अपघातात महिला जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडी येथील बारकरी मठाजवळ शुक्रवारी सकाळी ९.२५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात फरहद पेटकर (४५ रा. खेड) ही महिला जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी महिलेस उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही महिला दुचाकीने (एमएच ०८ एडी ५९६९) खेड येथून कळंबणीच्या दिशेने जात असताना तिचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडला.
www.konkantoday.com




