
लांजा शहरात गॅस सिलेंडर घेवून जाणार्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने खळबळ
लांजा शहरातील श्रीराम पुलाजवळ बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका ऍक्टिवा दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे बाजारपेठ परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकीस्वार बाजारपेठेतून गॅस सिलिंडर घेऊन जात होता. श्रीराम पुलावरून खाली उतरून पुढे जात असताना त्याच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत संबंधित चालकाने तात्काळ सिलिंडर उचलून दुचाकीपासून दूर केला आणि स्वतःचा जीव वाचवला यानंतर काही क्षणातच दुचाकीने भीषण आग धारण केली.www.konkantoday.com




