नगराध्यक्षा ऍड. हुस्नबानू खलिफे यांच्या प्रयत्नातून राजापूर शहरातील मालमत्ताधारकांना आगामी वर्षभरात स्वतंत्र प्रॉपर्टी कार्डस्


राजापूरच्या नगराध्यक्षा ऍड. हुस्नबानू खलिफे यांच्या सततच्या प्रयत्नातून आता राजापूर शहरातील मालमत्ताधारकांना आगामी वर्षभरात स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहे. यासाठी काही वर्षांपूर्वी त्यांनीच शासनाकडून यासाठी ३५ लाख रूपयांचा निधी शासनाकडून न.प. साठी उपलब्ध केला होता.
सोमवारी नगराध्यक्ष दालनात त्यासाठी एक विशेष बैठक झाली. यासाठी न.प.च्या नगर विकास आणि इतर संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांसमवेत भूमी अभिलेख खात्याचे शिरस्तेदार शेखर पवार तसेच परिक्षण भूमापक रूपेश नागवेकर उपस्थित होते. राजापुरात सुमारे चार हजार मालमत्ताधारक आहेत. पैकी चारशे मालमत्ताधारकांची माहिती आणि मोजणी पूर्ण झालेली आहे. आगामी वर्षभरात उर्वरित मालमत्ताधारकांच्या माहितीसाठी शहरवासीयांच्या घरी एक पथक भेट देणार आहे. त्यावेळी मालमत्ताधारकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे व शासकीय दप्तरी नोंद असलेल्या माहितीची पडताळणी करून प्रॉपर्टी कार्डसाठी आवश्यक मजकूर गोळा केला जाणार आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करून आपल्या प्रॉपर्टी कार्डसाठी माहिती द्यावी असे आवाहन नगराध्यक्षा ऍड. खलिफे यांनी केले आहे.
राजापूर शहरातील नागरिकांच्या मालमत्तेच्या प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याच्या अनुषंगाने प्रशांत सर्व्हेअर्स पूणे यांना माहिती संकलित करण्याचे काम देण्यात आलेले होते. त्यांनी याबाबत काम पूर्ण होताच भूमीअभिलेख खात्याकडे आपला अहवाल सादर केलेला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button