
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमच पोलीस दलाकडून मध्यरात्री मानवंदना
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलीस दलाने यंदा प्रथमच एक अनोखा उपक्रम केला. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पोलीस दलाकडून प्रथमच मध्यरात्री मानवंदना देण्यात आली.
(१४ एप्रिल) डॉ. आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने रत्नागिरीतील त्यांचे हजारो अनुयायी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील पुतळ्यासमोर जमले होते. यावेळी पोलीस दलाने मध्यरात्रीच डॉ. आंबेडकर यांना सलामी देत मानवंदना दिली. यावेळी पोलिस अधीक्षक नितिन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील अन्य पोलिस अंमलदार उपस्थित होते. तसेच या ठिकाणी भीम अनुयायी देखील उपस्थित होते.




