निर्यात करणार्‍या कंपनींकडून आखडते हात, मासळीचे दर निम्म्यावर


कोकणातील विशेषतः हर्णे बंदरातील मासळीला अरब देशांमध्ये मोठी मागणी असते. ’म्हाकूल’ सारख्या मासळीची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मात्र युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाल्याने निर्यात करणार्‍या कंपन्यांनी मासळी खरेदी करणे बंद केले आहे. गोव्यातील ज्या कंपन्या हर्णे बंदरातून ९० टक्के मासळी उचलत असत त्यांनीही आता हात आखडता घेतल्याने मच्छीमारांसमोर मासळी विकायची कुठे?’ असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
मच्छीमारीचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. १५ मे नंतर अनेक मच्छीमार आपल्या नौका किनार्‍यावर शाकारण्यास (देखभालीसाठी) सुरुवात करतात. हातात उरलेल्या या दीड महिन्यात युद्धाच्या झळा कमी झाल्या नाहीत. तर मच्छीमारांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडण्याची भीती व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button