ग्रामिण रुग्णालयातील ब्लड स्टोअरेज युनिट सुरू पण एक्सरे मशिन बंदच


राजापूर अवघ्या दोन दिवसांपूर्वी आ. किरण सामंत यांच्या उपस्थितीत येथील ग्रामिण रुग्णालयात ब्लड स्टोअरेज युनिट सुरू करण्यात आलेले असताना ग्रामीण रूग्णालयातील एक्सरे मशीन मात्र अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे पुढे आले आहे. याठिकाणी उपचारासाठी येणार्‍या गोरगरीब रुग्णांची यामुळे मोठी गैरसोय होत असल्याने ही सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा करावा अशी मागणी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक दिलीप चव्हाण यांनी आ. किरण सामंत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
राजापूर तालुका ग्रामीण भागाचा असल्याने सर्वसामान्य नागरीकांसाठी राजापूर येथील ग्रामीण रुग्णालय हे उपचाराचे महत्वाचे केंद्र ठरते. दररोज तालुक्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने गोरगरीब रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. मात्र रुग्णालयातील एक्सरे मशीन बंद असल्यामुळे अपघातग्रस्त तसेच हाडांशी संबंधित आजार असलेल्या रूग्णांची मोठी परवड होत आहे. परिणाम रूग्णांना एक्सरे स तपासणीसाठी खाजगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button