खेडमध्ये भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा

ध्वजारोहण, बाईक रॅलीने वातावरण दणाणले

खेड : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) स्थापनेला आज (६ एप्रिल) ४६ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाचा ध्वज फडकावून, पेढे वाटप व बाईक रॅली काढून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत यावेळी स्थापना दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी उपस्थित भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोले, विद्यमान नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, वैजेश सागवेकर, पांडुरंग पाष्टे, भाजपा अल्पसंख्यांक सेल खेड शहर अध्यक्ष नईम चौगुले, प्रीती चिखले, भरत कार्ले, मृत्युंजय मोडक, राहुल प्रभू, विजय पवार, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विजय गुप्ता, प्रदीप भोसले, प्रशांत बारटक्के, ओवैस चौगुले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button