
रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर अशा साहसी खेळांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा भविष्यात अधिक सक्षम करण्यात येणार-पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत
रत्नागिरी जिल्हा ॲक्वेटिक असोसिएशन आयोजित ‘आठवी रत्नागिरी ओशन स्विमथॉन’ आज भाटये बीच येथे दिमाखात पार पडली. याप्रसंगी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून जलतरणपटूचा उत्साह वाढवला.
यावेळी बोलतांना रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर अशा साहसी खेळांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा भविष्यात अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर केले.
भाटये बीचवर सुरु असलेल्या या स्पर्धेला श्री. मनोज साळवी, श्रीमती निशा बेडगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती व स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते.



