
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, रत्नागिरी चॅप्टरच्या Spiritual Cellतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त रत्नागिरीत भारत माता पूजन

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, रत्नागिरी चॅप्टरच्या Spiritual Cellतर्फे राम मंदिर येथे भारत माता पूजनाचा कार्यक्रम भक्तिभावाने आणि देशप्रेमाच्या वातावरणात उत्साहात पार पडला.
शनिवारी सकाळी ८.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात भारत मातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करून राष्ट्रनिर्माण, राष्ट्रसेवा आणि देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला. भारत माता पूजनाच्या माध्यमातून देशाविषयी आदर, कृतज्ञता, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा जागर करण्यात आला.
“चला, भारत मातेचा सन्मान करूया, राष्ट्रसेवेचा संकल्प घेऊया!” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या सदस्यांसह देशप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी Spiritual Cell Konkan Region Coordinator ज्योती नलावडे, कोकण Region Head राजेश शेट्ये तसेच रत्नागिरी चॅप्टरचे Chapter Chairperson तेजस महागांवकर, Chapter Secretary जान्हवी हेळेकर आणि Chapter Treasurer लोकेश्वर चाळके यांनी सहकार्य केले.
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक इंजि. माधवराव भिडे यांच्या “उद्योजकत्व हा एकच ध्यास, चला घडवू नवा इतिहास” या विचारधारेतून उद्योजकतेसोबतच सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहिताची जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.




