
खेडमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन
खेड : भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) स्थापनादिनानिमित्त इन्फिगो आय केअर हॉस्पिटल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामागे वैभव खेडेकर यांची संकल्पना असून नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदूविषयी सल्ला तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन मोफत दिले जाणार आहे. हे शिबिर खेड परिसरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिबिराचे वेळापत्रक असे : ६ एप्रिल – रहीम सहिबोले (नगरसेवक) कार्यालय, पाण्याच्या टाकीजवळ, खेड. ७ एप्रिल – समाज मंदिर, ओम चैत्य मारुती नगर, खेड. ८ एप्रिल – श्रीकृष्ण मंदिर, कुंभारसाई, खेड.
अधिक माहितीसाठी खेड शहराध्यक्ष नंदू साळवी (८०८७९८२८९९), नगरसेवक रहीम सहीबोले (८०८७५९७३३३), नगरसेविका वैभवी खेडेकर (८८३०१५६०९९),
नगरसेविका स्वप्नाली चव्हाण (८८५०७५२८४२)
विवेक कदम (इन्फिगो, ८९८३३५६७२८) यांच्याशी संपर्क साधावा.
खेड शहरातील सर्व नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या शिबिरास उपस्थित राहून डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.



