
फैय्याजहुसेन कुरेशी खून प्रकरणात मृतदेह जाळण्यास मदत केल्याप्रकरणी एकास अटक
मुंबई-मालाड येथील एहजासहुसेन फैय्याजहुसेन कुरेशी यांचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह रामपूर-आवटेवाडी जंगल परिसरात जाळण्यात आला. याप्रकरणी तालुक्यातील रेहेळ भागाडी येथील सागर संतोष बिरीत (३३) याला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. मृतदेह जाळण्यात त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शुक्रवारी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
कुरेशी यांच्या खूनप्रकरणी विशाल खोडदेकर आणि त्याची मैत्रीण जन्नतुनिसा खान या दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. दोघही सध्या पोलीस कोठडीत आहेत. मुंबई मालाड येथे १४ नोव्हेंबरला खून केल्यानंतर १५ नोव्हेंबरला कुरेशी यांचा मृतदेह एका बॅगमध्ये भरून तो कारमधून रामपूर-आवटेवाडी परिसरात जंगलमय टाकण्यात आला होता. भागात त्यानंतर जानेवारीत विशाल खोडदेकर याने त्याठिकाणची पाहणी करून मृतदेहाचे अवशेष जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यात रेहेळ-भागाडी येथील विशालचा मित्र सागर बिरीत याचादेखील सहभाग होता. पोलीस तपासात ही बाब स्पष्ट होताच गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली.www.konkantoday.com



