
खड्ड्यात पडलेल्या रेडकूची सुखरूप सुटका
नगरसेविका पूजा पवार आणि नगरपालिका अग्निशमन दलाची कार्यतत्परता
रत्नागिरी : साळवी स्टॉप येथे मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यांमध्ये आज सकाळच्या सुमारास रेडकू पडल्याचे काही नागरिकांना निदर्शनास आले.
नागरिकांनी तत्काळ तिथल्या स्थानिक नगरसेविका सौ. पूजा दीपक पवार यांना कळविले. पूजा पवार यांनी तत्काळ घटनेची माहिती नगरपालिका कर्मचाऱ्यांना दिली आणि पालिका कर्मचाऱ्यांसह स्वतः घटनास्थळी जाऊन त्या रेडकुला सुखरूप बाहेर काढताना त्या तिथे उपस्थित राहिल्या.
यावेळी त्या ठिकाणी शांताराम नारकर, शुभांगी बिंगी, नागरिक राजेंद्र कळंबटे, उपस्थित होते. संदेश कांबळे यांनी यावेळी तत्काळ जेसीबी उपलब्ध करून दिला. तसेच ज्या खड्ड्यांमध्ये रेडकू पडले होते, त्या ठिकाणी संबंधित हायवेचे ठेकेदार आरआयपीएल प्रियरंजन कुमार यांना बोलावून पूजा पवार यांनी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिडेट्स तसेच रेडियम लावण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या आहेत.




