
गणराज तायक्वांदो क्लबची राष्ट्रीय स्तरावरील ब्लॅक बेल्ट परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी
रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी स्पोर्ट्समार्फत ‘ब्लॅक बेल्ट दान प्रमोशन टेस्ट’चे आयोजन केले होते. यात गणराज तायक्वांदो क्लबचे खेळाडू दुर्वा मंदार हातीसकर, अनया अभिज्ञ वणजू, अहाना आशिष रसाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ही परीक्षा झाली. ही परीक्षा अखिल भारतीय (ऑल इंडिया) स्तरावर घेण्यात आली असून, यासाठी संपूर्ण भारतातून तायक्वांदो ५०० हून अधिक खेळाडू रत्नागिरीत दाखल झाले. खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याची आणि शारीरिक क्षमतेची कसून चाचणी या परीक्षेत घेण्यात आली.
या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेसाठी रत्नागिरीतील प्रतिष्ठित चाचणीत गणराज तायक्वांदो क्लबचे खेळाडू दुर्वा हातीसकर, अनया वणजू, अहाना रसाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना महिला प्रमुख प्रशिक्षक आराध्या प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा आणि सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, जिल्हा सचिव लक्ष्मण करा, उपाध्यक्ष विश्वास लोखंडे आणि कोषाध्यक्ष शशांक घडशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे गणराज क्लबचे अध्यक्ष ॲड. पूजा शेट्ये, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, नगरसेविका पूजा पवार, नगरसेवक राजन शेट्ये, नगरसेवक सौरभ मलुष्टे, के. एस. पोवार, क्लब उपाध्यक्षा साक्षी मयेकर, सदस्य परेश मोडूंळा, स्नेहा मोरे, शलाका जावकर, सिनियर खेळाडूंसह पालकांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.




