चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वेदा पाडावेचा ठाकरे युवासेनेकडून गौरव

रत्नागिरी नगरपालिकेने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत आर. बी. शिर्के हायस्कूलची कुमारी वेदा विजय पाडावे हिने इयत्ता ८वी ते १०वी गटात प्रथम क्रमांक पटकावून देदीप्यमान यश मिळवले. तिच्या या यशाबद्धल उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेमार्फत तिचा गौरव करण्यात आला.
चित्रकला स्पर्धेच्या वरिष्ठ गटात, वेदाने आपल्या कलेने परीक्षकांची मने जिंकली आणि अव्वल स्थान पटकावले. तिने काढलेल्या चित्रातून स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरीचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना परिक्षकांनी व्यक्त केली. तिच्या या यशाबद्धल युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी तिच्या घरी जावून तिला सन्मानित केले. प्रशस्तिपत्र व भेटवस्तु देवून तिचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख संदेश नारगुडे, शिवसेना विभागप्रमुख मयूरेश पाटील, किरण तोडणकर, ओमकार वायंगणकर, मंदार वारेकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button