भारतीय जनता पार्टी आयोजित महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या वतीने भव्य मंगळागौर, सोहळा मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती, महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य मंगळागौर स्पर्धा व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकारांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याने महिला वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा. देवेंद्रजी फडणवीस , भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री तथा भा. ज. पार्टीचे ज्येष्ठ नेते मा आशिषजी शेलार जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा मा. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटींची उपस्थिती. यामध्ये ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम हार्दिक जोशी (राणादा), ‘तुझ्यात जीव रंगला’ व ‘सरस्वती निवास’ फेम अक्षया देवधर (मास्तरीणबाई), ‘बाणू’ या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री ईशा केसकर, प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत तसेच स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ फेम अभिनेत्री गिरिजा प्रभू यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा वर्षाताई परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मंगळागौर सोहळ्यामध्ये पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळागौर हा केवळ मनोरंजनाचा उत्सव नसून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा, परंपरेचा आणि महिला शक्तीच्या एकतेचा उत्सव आहे. आधुनिकतेच्या युगातही आपल्या पारंपरिक खेळांना व संस्कृतीला जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे वर्षाताई ढेकणे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित माता-भगिनींना केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम व्हावे, यासाठी महिला मोर्चाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

रत्नागिरीतील सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य मंगळागौर सोहळ्याचा आनंद घ्यावा, आपल्या पारंपरिक संस्कृतीचा उत्सव साजरा करावा आणि मराठी मनोरंजन विश्वातील आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी साधावी, असे उत्स्फूर्त आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई परशुराम ढेकणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button