
आता राज ठाकरेंनीही पक्षात फिरवली भाकरी,मनसेत मोठा संघटनात्मक फेरबदल
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही उलटफेर करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची बांधणी करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरेंनी पक्षात मोठे भेर बदल केले आहेत. पक्षातील नेत्यांवर जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम दिली आहेत.नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांवर थेट लढा देणारा पक्ष म्हणून जनमानसात ओळख करा, असे आदेश देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंनी संपर्क अध्यक्षांची बैठक घेत पक्षवाढीचा रोडमॅप मांडून नव्या नेमणुका जाहीर केल्या.विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार
मनसेने ‘संपर्क अध्यक्ष’ पद कार्यान्वित करून पक्षाचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील विभाग अध्यक्षांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी दिली. प्रत्येक महिन्यात किमान ३ दिवस संबंधित जिल्ह्यास भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या. त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना राज यांनी नेत्यांना दिल्या आहेत. यासह आगामी निवडणुकांचा विचार करता पुढील साडेतीन वर्षाच्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
हे आहेत नवे संपर्क अध्यक्ष
कोकण विभाग :
संदीप देशपांडे, योगेश परुळेकर,
राजेश येरुणकर (रायगड),
शिरीष सावंत, संदीप दळवी (सिंधुदुर्ग), नितीन सरदेसाई,
शिरीष सावंत (रत्नागिरी),
मनोज चव्हाण, संजय नाईक (ठाणे),
प्रमोद (राजू) पाटील, केतन नाईक (पालघर).
मराठवाडा विभाग :
बाळा नांदगावकर, बंटी म्हशीलकर, दिलीप चितलिंगे, बिपीन नाईक (छ. संभाजीनगर),
राजेंद्र वागसकर (धाराशिव),
दिलीप धोत्रे (लातूर),
जयप्रकाश बाविस्कर (जालना),
संतोष नागरगोजे, सतनामसिंग गुलाटी (नांदेड).
पश्चिम महाराष्ट्र :
अमित ठाकरे,
अविनाश अभ्यंकर,
अमेय खोपकर (पुणे),
किशोर शिंदे, सुधीर पाटसकर (सोलापूर),
रणजित शितोळे, गणेश सातपुते (सातारा),
यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले (कोल्हापूर).
उत्तर महाराष्ट्र :
अविनाश जाधव, अभिजीत पानसे (नाशिक),
प्रकाश भोईर (धुळे),
कर्णबाळा दुनबळे (नंदुरबार),
संदीप पाचंगे, आशिष साबळे (जळगाव),
नयन कदम (अहिल्यानगर).
विदर्भ: हेमंत संभूस (नागपूर),
राजू उंबरकर (अमरावती),
हेमंत गडकरी (अकोला),
प्रशांत कनोजिया (यवतमाळ),
बाळा शेडगे (बुलढाणा).




