
महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी रत्नागिरीच्या डॉ. ऋषिकेश केळकर यांची नियुक्ती; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून निवड
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाने रत्नागिरीतील युवा नेतृत्व डॉ. ऋषिकेश केळकर यांची महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केली.
डॉ. केळकर यांनी यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. राजकीय कार्यासोबतच डॉ. जे. एस. केळकर मेमोरियल फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत.
नव्या जबाबदारीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्यसेवकांना संघटनेशी जोडून प्रदेशभर वैद्यकीय आघाडी मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल रत्नागिरीसह कोकणातून अभिनंदन होत आहे.




