
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन मध्ये “सागरी मत्स्यालयाचे व्यवस्थापन” या विषयावर श्री. इम्रान शेख यांचे व्याख्यान

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे “सागरी मत्स्यालयाचे व्यवस्थापन” या विषयावर श्री. इम्रान शेख यांचे दि. १ एप्रिल, २०२६ रोजी परिषद दालन, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात करताना सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी प्रमुख पाहुणे श्री. इम्रान शेख यांची ओळख उपस्थितां ना करून दिली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी सर यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. श्री. इम्रान शेख हे मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी असून सध्या ते राष्ट्रीय मत्स्यालय, अबूधाबी येथे सागरी जीवशास्त्रज्ञ आणि मत्स्यालय तज्ज्ञ या पदावर कार्यरत आहेत.
श्री. इम्रान शेख यांनी सागरी मत्स्यालय योग्य प्रकारे चालवण्यासाठी पाण्याची गुणवत्ता, उपकरणे, मासे व वनस्पतींची काळजी, अन्न व्यवस्थापन, रोग नियंत्रण, प्रकाश व्यवस्था, फिल्ट्रेशन प्रणाली याविषयी सोप्या भाषेत आणि सविस्तर माहिती दिली तसेच मत्स्यालयाची नियमित देखभाल ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. जगभरामध्ये सागरी मत्सालयांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून या मत्सालयांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी तयारी केली तर यात हमखास यश आणि यशस्वी करियर होईल असे सांगितले .
कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमा अंती चर्चासत्रामध्ये उपस्थितांनी सागरी मत्स्यालयाचे व्यवस्थापन याविषयी आधिक माहिती जाणून घेतली. सदर कार्यक्रमासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव येथील अधिकारी, संशोधक तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




